Header Ads Widget

eco sensitive zone - मामाच्या गावाला मान मोठा; गाववाल्यांनो इको झोनचा ठेवा जपा


eco sensitive zone - मामाच्या गावाला मान मोठा; गाववाल्यांनो इको झोनचा ठेवा जपा

झुक झुक झुक झुक अगीन गाडी...मामाच्या गावाला जाऊया...ही कविता सर्वांच्या ओठी असते. ही कविता ओठी आली की माझ्या मामाच्या गावाची आठवण तर येतेच, त्याबरोबर मामांचीही आठवण येते.

पैशापाण्याची गोष्ट

'आडिवरे टाइम्स'मध्ये आडिवरे परिसरातील तीन गावांची नावं इको झोनमध्ये आली. त्यात कोंडसर खुर्द हे नाव होतं. आडिवरे परिसरातील कोंडसर खुर्द हे माझ्या मामाचं गाव. त्यातील शेडेकरवाडी. सातवीपासूनची ती अगदी बारावीपर्यंतचं बालपण याच शेडेकरवाडीत गेलं. रामचंद्र शेडेकर अर्थात बंड्या शेडेकर हे माझे मामा. गावात मामाच्या नावाचा दबदबा. बंड्या शेडेकर या नावानेच ते जास्त ओळखले जातात. गावात त्यांचा मानही मोठा आणि शानही मोठी. त्यामुळे आपली ओळख 'हा बंड्याचा भाचा'. मी सातवीत असताना आईचं छत्र हरपलं आणि मामांनी छत्र धरलं. कायमचं. अशा माझ्या मामाचा गाव इको झोनमध्ये आला याचा खूप आनंद झाला. 

पैशांची गरज आहे तर येथे भेट द्या

माझ्या बालपणीची शेडेकरवाडी सर्वार्थाने वेगळी होती. त्यासाठी निदान २५ वर्षे मागे जावं लागेल. सर्वात अप्रूप वाटायचं ते पंदलीच्या पाण्याचं. स्वच्छ, सुंदर आणि गोड पाणी. चोवीस तास शेडेकरवाडीची तहान भागवणारीही पंदल.छोट्या डोंगरातून अविरात वाहणारा पाण्याचा झरा म्हणजे शेडेकरवाडीचे जीवन. या जीवनालाच आता इको झोनमुळे अधिक जिवंतपणा येईल. या ठिकाणी केव्हाही जा...जो काही थंडवा आणि शांतता जाणवते त्याने मन अगदी प्रसन्न होऊन जाते.  त्यामुळे इको झोन जपला पाहिजे. 

पैसे घ्या आणि गरजा पूर्ण करा

पहाटे पाच वाजल्यापासून मामाचे गाववाले पंदलीचं पाणी भरायला लागायचे. डोकीवर हांडा, काखेत कळशी घेऊन पाणी आणलं जायचं. एकमेकांना नंबर आला की हाक मारायची...ही जी काही पद्धत होती ती लयभारी...शेडेकरवाडीच्या मळ्यातला फेरफटका मारणं हे तर नित्याचं झालं होतं. मळ्यात फिरणं आणि मळ्यातच मैदान बनवून किक्रेट खेळणं...याची मजा काही औरच होती. पण खरी मजा यायाची ती पावसात. विलखी (पऱ्या)च्या बांधांवरून चालताना. पाणपोईची पानं काढताना आणि दगडी कमानीच्या साकवावर उभ राहून सर्व मळा पाहताना... पाणपाईची पानं वह्या आणि पुस्तकात जपून ठेवायची. पुस्तकात पाणपोईचं पान असणं हे वेगळचं वाटायचं.... 

कुठे कर्ज मिळत नाही, येथे भेट द्या

कोंडसर खुर्दचा सडा तसा विस्तीर्ण...मध्ये मध्ये अनेकांची कुपनं. याच कुपनात खळं. भातझोडणी ते भातमळणी येथेच व्हायची. कापलेलं भात आणून सुरक्षितरीत्या ठेवायची जागा म्हणजे खळं. कोंडसरच्या सड्यावरचा, आजूबाजूचा परिसर तसा परियचाच झाला होता. कारण माझ्या गावी तळीवर जाताना याच सड्यावरून जाणारा रस्ता होता. या रस्त्याने जाताना एक तळं लागायचं. अगदी उन्हाळ्यातही थोडं फार पाणी असायचं. मात्र पावसाळ्यात हे तळं पाहणं एक नजराणा वाटायचं.  तसेच कोंडसरच्या सड्यावर आणखी एक खास आकर्षण असायचं ते एकाच नजरेत तुम्हाला शाळा, मंदिर आणि स्मशानभूमी पाहता येतं याचं. 

कोंडसर खुर्दला मळ्याचा किनारा खूप लांबवर लाभलाय. त्यानंतर काही भागात मुचकुंदी खाडीचा...जुवे हा अतिशय महत्त्वाचा भाग.याच जुव्यात वाण पकडलं जायचं. वाण अर्थात शेडेकरवाडी आणि बेनगी ग्रामस्थ मिळून मासे पकडत असतं. या ठिकाणी बंधारा झाला आणि ही पद्धत मोडीत निघाली. असो. 

काही करून दाखवायची तयारी आहे

शाळेच्या पुढील भागात कोणी आहे. उंचावरून पडणारे पाणी समोरून दिसत नाही,मात्र हा छोटेखाणी धबधबाच  म्हणायला हवा. तर दुसरीकडे घणसतळीचा मोकळा भागही तु्म्हाला खुणावत असतो. त्यामुळे हा मोकळा भाग हा मोकळ्या श्वासासारखा वाटतो. त्याचे भविष्यात तुकडे होऊ नये आणि शेडेकरवाडी निसर्गांनी बहरेलली राहावी यासाठी इको झोनचं स्वागत करायला हवं.     

पावणाकवाडीतील चिऱ्यांची घाटी भारी वाटायची. ती अगदी सड्यापर्यंत जायची. सड्यावर जायचा शेडेकरवाडीत तीन तरी घाट्या आहेत. तर पावणाकवाडीच्या वरच्या बाजूने बेनगीत जाणारी एसटीचा रस्ता. सकाळी आणि संध्याकाळी एसटी यायची. ही एसटी रोज येत असली तरी गाडीचा आवाज आला की पाहायला बाहेर यायचं. चढणीवरचा एसटीचा आवाज संपूर्ण गावात घुमायचा. हातात घड्याळ नसले तरी लोकांचा एसटीच्या येण्यावर जाम विश्वास होता. कारण गाडी आली म्हणजे पाच वाजले हे समीकरण पक्क झालं होतं. एखाद्या दिवशी गाडी वेळेवर आली नाही तर गाडीला उशीर झाला असे म्हणत नसतं तर अजून पाच नाही का वाजले, गाडी आली नाही अजून असं म्हटलं जायचं. म्हणून ही लालपरी लोकांची लाडकी आहे.

साईड इन्कम हवं आहे का ?

निसर्गाने नटलेल्या शेडेकरवाडीत छोट्या छोट्या पक्ष्यांची कमतरता नाही. त्यांच्या सुंदर, मंजुळ आवाजाने पहाट व्हायची. एक तरी कोकीळ गात गाववल्यांना उठा आता पहाट झाली असा म्हणत असायचा. कावळ्यांची कावकाव, चिमण्यांची चिवचिव, कातळावर टिटव्यांचा टिवटिवाट हे सर्व मनाला, कानांना आणि डोळ्यांना भुरळ घालणारं. अशा शेडेकरवाडीत झाडांचीही विविधता आहे. वडापिंपळांच्या झाडांपासून विविध प्रकारची झाडं आहेत. ही सर्व निसर्ग संपत्तीच आहे. जी जपायला हवीच. म्हणून वाटते , मामाचा गाव इको झोन झाला हे कोंडसर खुर्दचं भाग्यच आहे.

इको झोन झाला तरी तुम्हाला स्वत:चा विकास करता येणार आहे. तुम्हाला घरं बांधता येणार आहेत. रस्ते बनवता येणार आहेत. पाळापाचोळा वापरता येणार आहे. शेतीसाठी अर्थात गावच्या भाषेत सांगायचं तर भाजावळ (शेत जमिनीची मशागत) करण्यासाठी तुम्हाला झाडांचा वापरही करता येणार आहे. भविष्यात प्रदूषणमुक्त जीवन जगता येणार आहे. त्यामुळे इको झोनचा मिळालेला दर्जा माझ्या मामाच्या गाववाल्यांनी हातचा घालवू नये, असे मनापासून वाटते. निसर्गला हानी पोहोचवणाऱ्या उद्योग - व्यावसायांना रोख लागणार असला तरी छोटे छोटे व्यवसाय आणि पर्यावरणपूरक अनेक गोष्टी करता येणाऱ्या आहेत. 

पैसा कुणाला नको असतो

अनेक गावांचे सडे अर्थात कातळावरच्या जमिनी विकल्या गेल्या आहेत. वाईट हेच आहे की या जमिनी घेणारे कुणी गाववाले नाहीत. त्या इतरांच्या ताब्यात जात आहेत. इतरांच्या ताब्यात जमिनी गेल्या की तेथे त्यांना जे जे हवे ते ते केले जाते. मग गाववाल्यांच्या म्हणण्याला कुणी विचारतही नाही. आपल्याच गावात आम्ही परके होतो की काय, अशी अवस्था होत आहे. अशा या परिस्थितीत मामाचं गाव इको झोन झालं याचा आनंद आणि अभिमानही वाटतो....तेव्हा

झुकु झुक झुक झुक अगीन गाडी

इको झोन वाडी पाहूया 

मामाच्या गावाला जाऊया

मामाच्या गावाला जाऊया...


मामा - भाच्याचा योगायोग

माझ्या मामाच्या गावाला इको झोन घोषित झाला तसा माझ्या मामाचा गावही इको झोन घोषित झाला. माझ्या मामाचं गाव डोंगर...अर्थात डोंगरवाडी. प्रशासकीय दृष्टीने डोंगरवाडी हा कोंडसर खुर्दचा भाग. मात्र झालंय पृथ्वी आणि चंद्रासारख. चंद्र हा पृथ्वीचा भाग, पण पृथ्वीपासून दूर. तसं कोंडसर खुर्द आणि या डोंगरवाडीचं. कोंडसर खुर्दपासून डोंगरवाडी चालत एका तासाच्या अंतरावर असली तरी मध्ये रुंढेगाव आहे. एका गावाची वेस ओलांडून नंतर डोंगरवाडीत जावं लागतं. रुंढेगावाच्या काखेत हे डोंगर वसलेलं आहे. गाव डोंगर असलं तरी वाडी मात्र लहान आहे. असं असलं तरी येथील माणसं डोंगराएवढ्या मनासारखी आहेत. 

तुम्ही विका आणि पैसे कमवा

मामाचा मामा म्हणजे डोंगरालीत गोराठे घराणे. विठू गोराठे, लक्ष्मण गोराठे, तुकाराम गोराठे हे मामांचे मामा. मामाची आई ही मामांसारखीच प्रेमळ. मग आम्ही आजीसोबत डोंगरात जात असू. मे महिना आणि दिवाळीत डोंगरात जाणं व्हायचं. नंतर कधी तरी शनिवारी - रविवारी. 

परिस्थितीनुसार आता डोंगर बदललं आहे. मात्र २० - २५ वर्षांपूर्वीचं डोंगर म्हणजे निसर्गाचं कोंदण. दाट झाडी, दोन मोठे परये (पऱ्ये) त्यांच्या बाजूने खूप मोठ मोठे दगड. गाव छोटं असलं तरी आंबे आणि फसणांची मोठी  बरकत होती. आंबे इतके असायचे की आणि इतक्या चवीचे असायाचे की जेवण कमी आणि आंबेच पोटात जायचे. प्रत्येक जण टोपली टोपलीने आंबे आणायचे. त्यावेळी हर्डिकरांचे आगार होते. त्यानंतर त्यांची शेती. त्यांच्या या आगारात आंबेच आंबे पडलेले असायचे. सड्यावर (कातळावर) जाण्यासाठी दगडी घाटी होती. या घाटीच्या दोन्ही बाजूला आंब्यांची झाडं होती. त्यामुळे पाहावे तिकडे आंबे पडलेले असायचे. प्रत्येकाच्या अंगणातील मांडवावर साटं अर्थात आंबापोळीची ताटं वाळत असतं. सकाळी आंबे आणायचे. त्याचा आंबरस काढायचा आणि ताटांमध्ये साटं घालायची. हा साटं उन्हात सुखल्यानंतर ती काढायची आणि पावसात त्याचा आस्वाद घ्यायचा. डोंगराच्या सड्यावर करवंदही मोठ्या प्रमाणावर मिळायची आणि जवळपास प्रत्येकाच्या घरासमोर किंवा परसावात एक - दोन फणसाची झाडे होतीच. त्यामुळे कापा - बरका फणसाचा स्वादही घेता येत असे. असो.

गेम खेळा, पैसे कमवा

या डोंगरवाडीतही शेडेकरवाडीसारखं चौवीस तास पाणी असायचं. क्षेत्रपळ देवस्थान असलेल्या भागातून पाटाने पाणी येणारं पाणी पाहिलं की 'झुण्णूक झुण्णूक टाळ वाजवी पाटामधलं पाणी' हे गाणं ओठी आल्याशिवाय राहात नाही. हे पाटाचं पाणी हर्डिकर यांच्या आगारात असलेल्या रतनबावीत जाई. (रतनबाव म्हणजे मोठा चौकोनी आकाराचा मोठा हौद बांधण्यात आला होता) या रतनबावीत पाणी भरल्यानंतर उर्वरित पाणी बाहेर पडून आगारात जाई. आता हे सर्व बदललं असलं तरी 'जुन्या' डोंगराच्या आठवणी 'सोन्या'सारख्या आहेत.


Post a Comment

0 Comments